Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी बाजार समितीच्या वजन काट्यावर ठिय्या

पाथर्डी - गेल्या पाच-सहा दिवसांत तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक गावातील चारा छावण्या बंद झाल्यामुळे आज बुधवारी बाजारच्या दिवशी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत ऊस विक्रीसाठी आणलेल्या मालकांनी ऊसाचे दर अचानक वाढविल्याने चारा खरेदी करण्यासाठी आलेल्या शेकडो शेतकर्‍यांनी येथील बाजार समितीच्या वजन काट्यावर ठिय्या आंदोलन करत बाजार समितीचा वजन काटा बंद पाडला.सभापती बन्सीभाऊ आठरे यांच्या आश्वासनानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.
 गेल्या पाच-सहा दिवसांत तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक गावातील चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत.त्यामुळे चारा खरेदी करण्यासाठी आज तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती.याच संधीचा फायदा बघत ऊस(चारा) मालकांनी 3200 रुपये टना प्रमाणे असणारा चारा थेट 4000 रुपये टन केला.त्यामुळे शेतकर्‍यांनी संताप व्यक्त करत आम आदमी पार्टीचे संयोजक किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ऊस विक्री बंद करत बाजार समितीच्या वजन काट्यावरच ठिय्या दिला.यावेळी शेतकर्‍यांनी ऊस मालकांविरोधात घोषणाबाजी करत भाव कमी करण्याची मागणी केली तसेच नगरच्या बाजार समितीच्या भावा प्रमाणेच ऊसाची विक्री करावी ही मागणी करण्यात आली.यावेळी नारायण शेकडे, अजिनाथ बालवे, योगेश गोल्हार, रामेश्वर शिरसाट, संजय शिरसाट, आदींसह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बन्सीभाऊ आठरे व सचिव दिलीप काटे यांनी योग्य ते आश्वासन दिल्यानंतर  आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments