Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नाशिक येथे पोलिस कॉन्सटेबलने घातल्या दोन सावत्र मुलांवर गोळ्या


नाशिक- शहरातील उपनगर पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असणार्‍या एका पोलिस कर्मचार्‍याने सावत्र असणार्‍या दोन मुलांवर गोळ्या झाडल्या घटना  अशवमेधनगर येथे शुक्रवारी (दि.21) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोन्ही सावत्र मुलांचा मृत्यू झाला आहे. सोनू नंदकिशोर चिखलकर(वय25) आणि शुभम नंदकिशोर चिखलकर(वय22)अशी मयत मुलांची नावे आहेत.
दुपारी चार वाजेच्या सुमारास घटना घडली आहे. नाशिकच्या उपनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले संजय भोये कॉन्सटेबल पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या सावत्र मुलांवर गोळीबार केला. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण घरगुती कारणावरून गोळीबार केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आपल्या मुलांवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी कॉन्सटेबल संजय भोये हे स्वतःहून पोलिसांना शरण गेले आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिस सध्या घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments