Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीस हेडक्टर येथील मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करावी - आ.जगतापअहमदनगर- पोलीस कन्येच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत व पोलीस वसाहतीतील मुलभूत सोयीसुविधांसाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून केली आहे.
11 जून रोजी नगर शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस होवून शहरातील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरात अनेक ठिकाणी झाडे, वीजेचे पोल पडले होते. पोलीस मुख्य वसाहतीतील एका घराच्या भिंतीत वीज पुरवठा झाल्याने एका युवतीचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी परिसरातील मुलभूत सोयी सुविधेच्या अभावाबाबत शासन व प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच त्या भागातील नागरिकांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
याबाबत संबंधित दोषींवर चौकशी करुन तात्काळ कार्यवाही करण्याचा आदेश करावा व अहमदनगर पोलीस वसाहतीतील मुलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments