Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फरार आरोपी विजय रासकर एलसीबीकडून अटक
अहमदनगर   ः खूनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी विजय आसाराम रासकर (रा.चौधरीनगर, सोलापूररोड, अ.नगर) याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
 भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गु.र.नं. 443/18 भादवि कलम 307, 34व गु.र.नं. 44/2019 भादवी कलम 326 यासह अन्य गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी विजय आसाराम रासकर हा कारखेल बु॥ शिवार, ता. आष्टी, जि.बीड येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारखले बु॥ येथे जाऊन रासकर याला मोठ्या शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. रासकर याच्यावर भिंगार कॅम्प, तोफखाना, नेवासा, आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
 पोना.रविंद्र कर्डिले, पोना सचिन आडबल, पोना ज्ञानेश्वर शिंदे, पोना संदीप पी पवार, पोकॉ. रणजित जाधव, पोकॉ. कमलेश पाथरुट, रोहित मिसाळ, चापोहेकॉ. संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Post a Comment

0 Comments