Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अपहणप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटकअहमदनगर  -  पोलिस कर्मचार्‍याचे अपहारण करून मारहाण केल्याच्या गुन्ह्यामध्ये फरार असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सुनील त्र्यंबके याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (दि.17) दुपारी अटक केली. यावेळी तोफखाना पोलिस ठाण्याच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
  याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनील त्र्यंबके याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने पोलिस कर्मचार्‍याला राहत्या घरून दुचाकीवर बळजबरीने बसवून संपर्क कार्यालयात घेऊन आला होता. यानंतर नगरसेवक सुनील त्र्यंबके व त्याच्या मित्रांनी पोलिस कर्मचार्‍यास लाकडी दांडके, लोखंडी गजाने मारहाण केली. यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अपहरण करून मारहाण  केल्याचा गुन्हा नगरसेवक सुनील त्र्यंबके व त्यांच्या मित्रांविरुद्धात दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पो.नि.प्रकाश पाटील हे करीत होते. पोलिसांना नगरसेवक त्र्यंबके हा सावेडी उपनगरामध्ये फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांना मिळाली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून त्र्यंबके याला पकडण्यात आले. नगरसेवक त्र्यंबके याला अटक केल्याची बातमी नगर शहरात पसरताच, तोफखाना पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.   

Post a Comment

0 Comments