Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2019; अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प


मुंबई- राज्याचा 2019-20 चा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. चार महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पात लोकाभिमुख योजना आणि सवलतींचा धडाका सुरू आहे. लांबलेला पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा कृषीउत्पादनात 8 टक्क्यांनी घट होईल, अशी चिंता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आलीये. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बळीराजाला कसा आधार देतात, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2019 या चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती.
 अर्थसंकल्पावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची उपस्थिती, केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी 4 हजार 563 कोटी रुपये, शेतीशी निगडीत कर्जवसुलीला स्थगिती, शेतकर्‍यांसाठी भरीव तरतूद, दुष्काळ निवारणासाठी मोठं काम,  शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,  पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण क्षेत्राची स्थापना, नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ रु.6 हजार 410 कोटी एवढी तरतूद, 8946 कोटी रुपये निधी जलयुक्त शिवार योजनेत खर्च, 4 कृषी विद्यापीठांना 600 कोटी रुपयांची तरतूद, काजू उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता

Post a Comment

0 Comments