Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे बाळगणारा अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


अहमदनगर -  वाटेफळ शिवारात गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आलेल्या आरोपीस पकडण्यास यश आले आहे. प्रवीण पांडुरंग बोराडे (वय 22, रा.सावरगाव, ता.भूम जि.उस्मानाबाद, ह.मु. गुणवडी ता.नगर) असे आरोपीचे नाव आहे. नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नगर ते सोलापूर महामार्गावरील वाटेफळ या गावाच्या शिवारात हॉटेल विश्वशांतीसमोर एक इसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह विक्रीसाठी घेऊन येणार आहे. अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे हॉटेल विश्वशांती वाटेफळ शिवारात पोलिसांनी सापळा लावून थांबले असता, त्या ठिकाणी माहितीप्रमाणे सदर इसमास पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने प्रवीण पांडुरंग बोराडे असे नाव सांगितले. यावेळी त्याची पंचसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे 25 हजार रुपये किंमतीची देशी बनावटीचे पिस्टल व 400 रुपयांचे दोन जिवंत काडतूस व एक मोबाईल असे एकूण 33 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तो माल जप्त करून पो.ना. संदीप पवार यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपी बोराडे याला नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.
 जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानीय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार पोसई ज्ञानेश फडतरे, पोना संदीप पवार, पोना. सचिन आडबल, संतोष लोढे, पोना रविंद्र कर्डिले, दीपक शिंदे, पोकॉ. रणजित जाधव, राहुल सोळुंके, कमलेश पाथरुट आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

Post a Comment

0 Comments