Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घुमरी येथे शेततळ्यात एका महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यूकर्जत  - शेततळ्यावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या दोन मुलींसह बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घुमरी येथे घडली. अनिता शरद पांडुळे (वय 30) या आपल्या दोन मुलींसह शेततळ्यांवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. खेळता खेळता सायली शरद पांडुळे (वय 5) आणि सोनाली शरद पांडुळे (वय 7) या दोघी शेततळ्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी अनिता गेली पण तिचाही बुडून मृत्यू झाला. यामुळे घुमरी गावावर शोककाळ पसरली आहे. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कर्जत रुग्णालयात नेण्यात आले होते. 

Post a Comment

0 Comments