Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जामखेड नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी 80 टक्के मतदान


एका जागेसाठी चौरंगी लढत 
जामखेड - जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग 14 च्या नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा फरिदा आसिफ खान यांच्या निधनाने रिक्त झालेल्या एका जागेसाठी झालेल्या चौरंगी लढतीसाठी रविवारी मतदान पार पडले. या निवडणूकीत भाजप पुढे जागा राखण्याचे तर इतर तिघा उमेदवारांना चमत्कार घडवण्याचे मोठे आव्हान रविवारी मतपेटीत बंद झाले. या पोटनिवडणुकीसाठी 78 टक्के विक्रमी मतदान झाले.
रविवारी (दि.24) सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. खर्डा चौक व महादेव गल्ली असे दोन बुथ होते. या प्रभागात एकुण 1428 इतकी मतदारसंख्या होती. येथील निवडणूकीत भाजप, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रिंगणात असून शिवसेना व एक भाजप बंडखोर रिंगणात उतरले असून चौरंगी लढत झाली.चारही उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रचार करत निवडणूकीत जोरदार रंगत आणली त्यामुळे निकालाचे गणिते बदलणार आहेत.चारही प्रमुख उमेदवारांनी रविवारी  सकाळी ईव्हीएम मशीनची पुजा करून मतदानास सुरवात केली. शनिवारी पडलेल्या पावसामुळे सकाळी मतदानाचा वेग कमी होता. नऊच्या सुमारास मतदार घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली. दोन्ही बुथवर ठराविक अंतरावर चारही उमेदवाराचे समर्थक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुरवातीला मतदानास निरुत्साह असला तरी त्यानंतर मात्र चुरशीने मतदान होऊ लागले. मतदान घडवून आणण्यासाठी उमेदवाराचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते. सायंकाळी चार नंतर मतदारांच्या रांगा वाढल्या होत्या. 
विद्यमान उपनगराध्यक्ष फरिदा खान यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग 14 मधील नगरसेवक पदासाठी पोटनिवडणुकीत होत आहे. या मतदारसंघात एकूण 1428 मतदार असून 750 च्या आसपास मुस्लिम समाजाचे मतदान आहे. त्या खालोखाल इतर समाज 450 तर मागासवर्गीय समाजाचे 228 मतदान आहे. जातीय समिकरणावरून प्रमुख राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी वाटप केले आहे. उमेदवारी देताना ऐनवेळी भाजपातील काही विघ्नसंतोषी नेत्यांनी उपनगराध्यक्षा फरिदा खान यांच्या कुटूंबातील सदस्यांना दिलेली उमेदवारी कापत दुसर्याच उमेदवाराच्या गळ्यात भाजपाच्या उमेदवारीची माळ घातल्याने मुस्लिम समाजात भाजपाविषयी काहीसी नाराजी पसरली होती. ही नाराजी दुर करता करता शेवटपर्यंतभाजपाच्या नाकीनऊ आले होते. दरम्यान  लोकसभा निवडणूकीनंतर तालुक्यातील भाजप सेना युतीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाली. सेनेच्या पदाधिकार्याने आपल्या पत्नीला उपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरवून भाजपालाच कडवे अव्हान दिल्याचे प्रचारात दिसून आले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष जमीर बारूद यांनी आघाडीची मोट बांधत काँग्रेसच्या उमेदवारासाठी दिलेली झुंज लक्षवेधी ठरली. काँग्रेस या निवडणूकीत खाते खोलणार असा दावा आघाडीकडून केला जात आहे.
या निवडणुकीसाठी शेख जाकीया आयुब भाजपा, शेख परवीन सिराजोद्दीन काँग्रेस तर शिवसेना तालुका प्रमुख संजय काशिद यांच्या पत्नी रोहीणी काशिद अपक्ष तसेच बाजार समितीचे संचालक सागर सदाफुले यांच्या मातोश्री मैनाबाई ज्ञानदेव सदाफुले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष गुंदेचा यांच्या पत्नी छाया संतोष गुंदेचा हे निवडणूक रिंगणात आहेत. परंतु शेवटच्या दोन दिवस अगोदर त्यांनी शिवसेना उपक्ष उमेदवार रोहिणी काशीद यांना पाठिंबा दिला होता. रविवारी झालेल्या मतदानात प्रभागा 14 मधील एकुण 1428 मतदारांपैकी 1117 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरूष  572 तर 545 स्त्रीयांनी मतदानात सहभाग घेतला. या निवडणूकीसाठी एकुण 78 टक्के मतदान झाले. मतदानाचा वाढलेला टक्का धक्कादायक निकालाची नोंद करणारा ठरेल अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. काँग्रेस व भाजपाकडून विक्रमी विजयाचा दावा मतदानानंतर करण्यात आला आहे.  दरम्यान 24 रोजी होणार्या मतमोजणीनंतरच जनतेचा कौल कुणाच्या बाजूने हे स्पष्ट होणार आहे.

जामखेड तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनच्या एका जागेसाठी रविवारी पोटनिवडणुक झाली या ठिकाणी 64 टक्के मतदान झाले. एकुण 494 मतदारांपैकी 320 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 165 पुरूष मतदारांनी तर 155 स्त्री मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी दुरंगी लढत झाली. 


Post a Comment

0 Comments