Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विधी सेवा प्राधिकरणाच्या कामात महिला वकिलांनी सहकार्य करावे - न्यायाधिश पाटील   अहमदनगर  - जिल्हा विधी सेवा प्राधिकारण हे सर्वसामान्य नागरिकांना आधार देणारे व न्याय देणारा महत्वाचा विभाग आहे. न्याय दानाबरोबरच न्यायालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी सामाजिक उपक्रमही राबवत आहोत. या उपक्रमांना सर्व वकिलांचे मोठे सहकार्य मिळते. समाजातील गरजू व पिडीत घटकांना योग्यप्रकारे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु. पुढील काळात विधीसेवा प्राधिकरणच्या माध्यमातून अधिक प्रभावी काम होण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सुटण्यासाठी महिला वकिलांनी पुढाकार घ्यावा. न्यायालयातील वकिलांचा बार हा सर्वात चांगला आहे. त्यामुळेच पुन्हा नगरमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिवपदी नव्याने रुजू झालेले सुनिलजीत पाटील यांनी केले.
  जिल्हा न्यायालयातील महिला वकिलांच्यावतीने न्यायाधिश सुनिलजीत पाटील यांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्राधिकरणाचा सदस्या अ‍ॅड.अनुराधा आठरे यांनी केला. यावेळी  अ‍ॅड.अनिता दिघे, अ‍ॅड.निता कांबळे, अ‍ॅड.प्रज्ञा उजागरे, अ‍ॅड.रेणु कोठारी, अ‍ॅड.अनुजा काटे, अ‍ॅड.निता कांबळे, अ‍ॅड.मिना भालेकर, अ‍ॅड.पल्लवी बारटक्के, अ‍ॅड.अरुणा राशीकर, अ‍ॅड. आशा पादीर, अ‍ॅड.शिल्पा राजपुत, अ‍ॅड.मनिषा भिंगारदिवे, अ‍ॅड.शितल आगरकर, अ‍ॅड.मोनिका भुजबळ, अ‍ॅड.रिजवाना शेख, अ‍ॅड.राणी भुतकर, अ‍ॅड.शुभांगी शिंदे, अ‍ॅड.संगीता पाडळे, अ‍ॅड.शिल्पा बेरड, अ‍ॅड.रत्ना दळवी, अ‍ॅड.दरंदले, अ‍ॅड. नायडू, अ‍ॅड.परदेशी, अ‍ॅड.झरेकर आदि महिला वकिल उपस्थित होत्या. यावेळी
अ‍ॅड.अनुराधा आठरे म्हणाल्या, सुनिलजित पाटील यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तीमत्वाची विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याने सर्व वकिलांना आनंद झाला आहे. यापूर्वीही त्यांनी नगरमध्ये चांगले काम केले आहे. अशा अभ्यासू व अनुभवी न्यायाधिशांमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरीब व महिला वर्गाला निश्चितच चांगला न्याय मिळेल. न्यायाधिश सुनिलजीत पाटील यांच्या या नियुक्तीमुळे सचिवपदी योग्य व्यक्ती निवडली गेली आहे. प्रास्तविक अ‍ॅड.अनिता दिघे यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड.अनुजा काटे यांनी केेले.   अ‍ॅड.निता कांबळे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments