Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर एलसीबी कडून बीड येथे महामार्गावर लूटमार करणारे टोळीतील चार आरोपी गजाआड

महामार्गावर लूटमार करणारी टोळी गजाआड एलसीबी ची कारवाई


अहमदनगर  - बीड जिल्ह्यातील कालिका नगर भागात नगर एलसीबी ने छापा टाकून 4 लूटमार करणारी टोळी गजाआड केली. परशुराम उर्फ प्रशांत मोहन गायकवाड (वय 19 रा.एकनाथ वाडी ता. पाथर्डी ह मु रा साईनगर आकाशवाणी बीड), इस्माईल अमीर शेख (वय 35 संजय नगर गेवराई बीड), तुकाराम अशोक पांचाळ (वय 29 पैठण ता.केज जि. बीड), रामेश्वर प्रल्हाद लाटे (वय 35 रा.ग्रामसेवक कॉलनी, बीड मूळ राहणार वेल्लोर ता. जि बीड ) अशी पकडण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  बीड जिल्ह्यातील कालिकानगर भागात चोरी केलेली कार ( एमएच बारा पी एन 99 55) हा बनावट क्रमांक लावून फिरत असल्याची माहिती नगर एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती त्यानुसार बीड येथे नगर एलसीबीचे पथकाने जाऊन कालिका नगर परिसरात सापळा लावून कारला घेराव घालून कारमधील असणारी चारही आरोपी जागीच पकडण्यात आले.

Post a Comment

0 Comments