Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीत दिरंगाई करणार्‍यांना वठणीवर आणा- उद्धव ठाकरे

औरंगाबाद - शेतकर्‍यांच्या कर्जमाफीत दिरंगाई करणार्‍यांना वठणीवर आणा, असे ठाणकवून सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकर्‍यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र तर मिळाले परंतु, अद्याप त्यांना कर्जमाफी मिळाली नसल्याने याबाबत आपण गरज पडल्यास मुख्यमंत्र्याकडे जाऊ, असेही ठाकरे म्हणाले.
 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी औरंगाबाद आणि नाशिक दौर्‍यावर निघाले. याच दरम्यान शिवसेनेच्या वतीने लासूर येथे पीक विमा तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.  त्यानिमित्त उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव यांनी आपल्याच सहकारी आणि सत्ताधारी पक्षावर ताशेरे ओढले. लोक आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही सत्ताधार्‍यांसोबत असतानाही सरकावर टीका का करता? सत्तेत असताना विरोधीपक्षाची भूमिका का बजावता? त्यांना एवढेच म्हणणे आहे की शिवसेना सत्ताधारी किंवा विरोधीपक्षासोबत नसून केवळ सामान्यांसोबत आहे. सामान्यांचा आवाज म्हणून आपण सत्तेत आहोत असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments