Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सुजय विखे निवडणूक खर्चातही प्रतिस्पर्धी ; सर्वाधिक खर्च



नगर रिपोर्टर टिम
अहमदनगर - लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च मुदतीत सादर केला आहे. नगरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले खासदार डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक खर्चातही प्रतिस्पर्धी उमेदवारांना मागे टाकल्याचे चित्र आहे. तर शिर्डीत काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सर्वाधिक खर्च सादर केला आहे.
सुजय विखे यांनी ६४ लाख ४९ हजार ३३२ रुपये खर्च सादर केला आहे. तर भाऊसाहेब कांबळे यांनी ५९ लाख ७९ हजार १३२ रुपये निवडणूक खर्च सादर केला आहे. दरम्यान, शिर्डी मतदारसंघातील विजयी उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी ५९ लाख ७३ हजार १८३ रुपयांचा निवडणूक खर्च सादर केला आहे. त्या पाठोपाठ भाऊसाहेब वाकचौरे यांनी २८ लाख १२ हजार रुपये खर्च सादर केला आहे.
प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा होती. आहे. केलेला खर्च सादर करण्यासाठी निवडणुकीचा निकाल लागल्यापासून तीस दिवसांची मुदत असते. त्यानुसार सर्वच उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला असल्याचे सांगण्यात आले.
नगर मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च
खा.डॉ. सुजय विखे : ६४ लाख ४९ हजार ३३२ रुपये
आ. संग्राम जगताप : ६१ लाख ८ हजार १३८ रुपये
नामदेव वाकळे : १ लाख ५५ हजार ६८९ रुपये
कलीराम पोपळघट : २५ हजार ८०० रुपये
धीरज बताडे : १४ हजार ६३० रुपये
सुधाकर आव्हाड : ३ लाख ५३ हजार ४२१ रुपये
संजय सावंत : ४४ हजार ४५० रुपये
आप्पासाहेब पालवे : २५ हजार ८०० रुपये
कमल सावंत : ४ लाख ४१ हजार ४४९ रुपये
भास्कर पाटोळे : १ लाख २ हजार ५३२ रुपये
रामनाथ गोल्हार : २७ हजार ५२० रुपये
शेख अबीद हुसेन : १ लाख ४० हजार ६८ रुपये
साईनाथ घोरपडे : ३५ हजार ४८९ रुपये
संजीव भोर : ६ लाख ९० हजार ५६४ रुपये
संदीप सकट : ३४ हजार ४२६ रुपये
श्रीधर दरेकर :५० हजार ११५ रुपये
फारूख शेख : २८ हजार ३०० रुपये
दत्तात्रेय वाघमोडे : २७ हजार रुपये
ज्ञानदेव सुपेकर : १ लाख १५ हजार ४४५ रुपये
'शिर्डी'तील उमेदवारांचा निवडणूक खर्च
भाऊसाहेब कांबळे : ५९ लाख ७९ हजार १३२
सदाशिव लोखंडे : ५९ लाख ७३ हजार १८३
बन्सी सातपुते : ७ लाख ४२ हजार १०२
सुरेश जगधने : ४ लाख ३९ हजार ४३१
संजय सुखदान : १४ लाख ४६ हजार १८६
अशोक जाधव : १ लाख ७७ हजार ९०७
प्रकाश आहेर : २ लाख ९३ हजार ५३३
विजय घाटे : १ लाख ७७ हजार ८५६
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे : २८ लाख १२ हजार ५४४
गोविंद अमोलिक : १४ हजार ४७०
अशोक वाकचौरे : १ लाख २८ हजार ५०
किशोर रोकडे : १७ हजार ७९
गणपत मोरे : ३८ हजार ७८७
प्रदीप सरोदे : ८ लाख ५२ हजार ६९७
बापू रणधीर : १४ हजार २६५
शंकर बोरगे : २९ हजार २६२
भाऊसाहेब जयराम वाकचौरे : १७ हजार २७२
सचिन गवांदे : ४५ हजार ३६९
सुभाष त्रिभुवन : ७९ हजार ६२८
संपत समिंदर : ३० हजार ७०१

Post a Comment

0 Comments