Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आज अहमदनगर महापालिकेचा वर्धापन दिननगर रिपोर्टर टिम
अहमदनगर -  अहमदनगर महापालिका स्थापनेला रविवारी (दि.३०) १६ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने प्रशासनाच्या पुढाकारातून नगरसेवक व अधिकार्‍यांमध्ये क्रिकेट सामन्याचे तसेच महापालिका मुख्यालयात वृक्षारोपणासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त सुनील पवार यांनी दिली. दरम्यान, मनपाच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
सन २००३ मध्ये ३० जून रोजी तत्कालीन नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यात आले होते. महापालिकेचा १६ वा स्थापनादिवस व सतराव्या वर्षात पदार्पणानिमित्त प्रशासनाच्या वतीने सकाळी ७ वाजता वाडियापार्क मैदानावर नगरसेवक व अधिकार्‍यांच्या क्रिकेट सामन्याचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. तसेच मनपा आवारात वृक्षारोपण करण्यात येणार असून, सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी, नगरसेवकांसह अधिकारी, कर्मचार्‍यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने उपायुक्त पवार यांनी केले आहे.
दरम्यान, वर्धापनानिमित्त मनपा मुख्यालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मनपाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये विविध दालनांसमोर मनपातील महिला कर्मचार्‍यांनीच पुढाकार घेऊन रांगोळ्या काढल्या आहेत. प्रशासनाने त्यांच्या स्तरावर छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करुन वर्धापन दिन साजरा करण्याची तयारी केली आहे.

Post a Comment

0 Comments