Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर प्रेस क्लबच्या कायदेशिर सल्लागारपदी अॅड. सुभाष काकडे, अॅड. विक्रम वाडेकर व अॅड. संतोष गायकवाड

*अहमदनगर प्रेस क्लबच्या कायदेशिर सल्लागारपदी*
*अॅड. सुभाष काकडे, अॅड. विक्रम वाडेकर व अॅड. संतोष गायकवाड*


अहमदनगर - पत्रकारांच्या हितसंवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या अहमदनगर प्रेस क्लब या संस्थेच्या कायदेशिर सल्लागार मंडळावर सल्लागार म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. सुभाष काकडे, अॅड. विक्रम वाडेकर व ॲड. संतोष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. प्रेस क्लबच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिली.
प्रेस क्लबच्या कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेच्या कामकाजात कायदेशिर सल्ला देणे आणि न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी कायदेशिर सल्लागार नियुक्त करण्याबाबत चर्चा झाली. धर्मदाय आयुक्त कार्यालयातील कामकाज व तत्सम कामाच्या अनुषंगाने ॲड. संतोष गायकवाड यांची कायदेशिर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा विषय एकमताने मंजूर करण्यात आला.
दिवाणी व फौजदारी प्रक्रियेच्या अनुषंगाने काही कायदेशिर बाबी निर्माण झाल्यास प्रेस क्लबला योग्य ते कायदेशिर सल्ला देणे व प्रसंगी न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी ज्येष्ठ वकिलाची गरज असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली. त्यानुसार सर्वसंमतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुभाष काकडे यांच्यासह ॲड. विक्रम लक्ष्मण वाडेकर या दोघांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रेस क्लबच्या स्थापनेस पंचवीस वर्षे पूर्ण झाली असल्याने रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार ‘समाचार’ चे माजी संपादक स्व. जनुभाऊ काणे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करणे, शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करीत असलेल्या पत्रकारांसाठी दोन दिवसांची निवासी कार्यशाळा आयोजित करणे, त्यासाठी पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रीत करणे व त्यांच्या व्याखानांचे आयोजन करणेबाबतही चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्यासह उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, सचिव मुरलीधर कराळे, अशोक झोटींग, निशांत दातीर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments